महात्मा शेक्सपिअरने मनुष्यजीवनाच्या ग्रंथावर नाटकाद्वारे भाष्य केले!
शेक्सपिअर मोठा, पण त्याच्या आयुष्याच्या व त्या भवतीच्या परिस्थितीच्या चौकटीत (frame of reference) त्याला पाहिले म्हणजे ध्यानी येते की, त्याच्या आगेमागे नामांकित नाटककार होते किड्, मार्लो, ग्रीन, बेन जॉन्सनसारखे. एकंदर देशस्थिती उत्साहवर्धक होती. युरोपात नवीन विद्या, नवी साहसे यांच्यामागे धावणारी पिढीमागून पिढी निर्माण होत होती.......